राजीवडा येथे पतीकडून पत्नीला मारहाण 

 रत्नागिरी:- शहरातील राजीवडा येथे अज्ञात कारणातून पती-पत्नीला शिवीगाळ करत हातांनी तसेच चाकुने मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चौघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वा.घडली.

इरसाल भाटकर,वसीक भाटकर,जुबेदा भाटकर,रोजीना भाटकर (सर्व रा.राजीवडा,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.त्यांच्याविरोधात गफार अबीब पकाली (55,रा.राजीवडा,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.त्यानूसार,27 ऑगस्ट रोजी सकाळी ते राजीवडा येथील मिनाज किराणा शॉपमध्ये जात असताना संशयितांनी त्याठिकाणी येउन त्यांना तसेच त्यांची पत्नी रियाना पकाली या दोघांनाही मारहाण करत ठार माण्याची धमकी दिली.याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस फौजदार राठोड करत आहेत.