रत्नागिरी:- शहराजवळील राजिवडा येथे मासेमारी जेटीच्या बाजूला समुद्राच्या पाण्यात उभी करुन ठेवल्या बोटीवरील ९० हजाराचे इंजीन चोरट्याने पळविले. शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ ते ५ ऑक्टोबर सकाळी साडेसातच्या सुमारास राजिवडा मासेमारी जेटी येथील समुद्राच्या पाण्यात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शोएब रियाज फणसोपकर (वय ३३, रा. राजिवडा नाका, रत्नागिरी) यांच्या पत्नीच्या नावे असलेली मासेमारी बोट- सना जोया (रजिस्टर क्र. एनडी-एमएच-४ एमएम ६२९४) ही शनिवारी (ता. ४) रात्री साडेनऊ ते रविवारी (ता. ५) सकाळी साडेसात यावेळात समुद्राच्या पाण्यात उभी करुन ठेवली होती. अज्ञात चोरट्याने बोटीवरील यामाहा कंपनीचे ९.९ हॉर्स पॉवरचे इंजिन क्र. ६ बी ३ के. एल १०३८०६४ हे ९० हजाराचे इंजिन पळविले. या प्रकरणी शोएब रियाज फणसोपकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.