राजापूर:- केळवडे येथील दिपक उर्फ बाबू राजाराम गुरव याला बंदूकीची गोळी लागून झालेल्या मृत्युप्रकरणी विजय यशवंत जाधव (५७ रां इंदवटी ता. लांजा) या आणखी एका संशयीत आरोपीला अटक करण्यात आली आहे. त््याला राजापूर न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणातील प्रथम संशयीत आरोपी संजय उर्फ बंडया महादेव मुगे रो केळवडे याला विजय जाधव याने काडतूस पुरविल्याचे पोलीस तपासात पुढे आल्याने त्याला अटक केल्याचे परबकर यांनी सांगितले.
तालुक्यातील केळवडे येथे बंदूकीची गोळी लागून दिपक उर्फ बाबू राजाराम गुरव (४५ ) याचा मृत्यु झाला होता. या प्रकरणी राजापूर पोलीसांनी केळवडे गावातील संजय उर्फ बंडया महादेव मुगे याला अटक केली असून संशयीत आरोपीने गुन्हयाची कबुली दिली आहे. तशी माहिती पोलीसांनी दिली आहे. मुगे याला १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावलेली आहे. या प्रकरणी पोलीसांनी मुगे याच्याकडील बंदूक व काडतूसे जप्त केली आहेत. या प्रकरणी पोलीस तपासादरम्यान संशयीत आरोपी संजय मुगे याने वापरेलेली व त्याच्याकडे असलेली काडतूसे ही इंदवटी लांजा येथून विजय जाधव याच्याकडून घेतल्याची माहिती तपासात पोलीसांना दिली. जाधव याच्याकडून आपण २० काडतूसे घेतल्याची माहिती मुगे याने पोलीसांना दिली आहे. त्यानंतर पोलीसांनी तात्काळ इंदवटी लांजा येथून विजय जाधव याला ताब्यात घेतले व त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ पर्यंत पोलीस कोठडी दिल्याची माहिती परबकर यांनी दिली आहे.
या प्रकरणी एकूणच तपास सुरू असून गावातील देवस्थान वादातुन हा प्रकार घडला आहे का याचाही पोलीस शोध घेत असल्याचे परबकर यांनी सांगितले. या प्रकरणी परबकर अधिक तपास करत आहेत.
या एकूणच खून तपास प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तसेच लाांजा उपविभागिय अधिकारी श्रीनिवास साळोखे यांच्या मार्गदर्शनाली राजापूर पोलीस स्थानकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे, पोलीस कर्मचारी प्रमोद वाघाटे, सागर कोरे, प्रसाद शिवलकर, सचिन विर, कमलाकर पाटील, संतोष सावंत, दिपक करंजवकर, संदीप गुरव, नितीन घोगले, पुजा चव्हाण, निलीमा बुधर, सुष्मा स्वामी, सुजित चव्हाण, सचिन बळीप, अनिल केसकर, विश्वास बाणे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सागर कोरे, प्रसाद शिवलकर यांनी या तपास कामी विशेष कामगिरी बजावली आहे. या दोघांनीही या गुन्हयाच्या तपासात महत्वाची भुमिका बजावली आहे. अत्यंत बारकाईने त्यांनी या गुन्हयात तपास करताना आपले कसब पणाला लावले आहे. संशयीत आरोपी, संपर्कातील लोक आणि एकूणच तपसात त्यांनी महत्वाची भुमिका बजावल्याचे पुढे आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. यातील प्रसाद शिवलकर हे नाटे सागरी पोलीस स्थानकात चालक म्हणून कार्यरत आहेत. तर राजापूर पोलीस स्थानकात गुप्तचर विभागात काम करणाऱ्या कोरे यांची नुकतंीच नाटे सागरी पोलीस स्थानकात बदली झालेली आहे.









