Monday, June 15, 2026
spot_img
Home राजकीय रनपच्या सार्वत्रिक निवडणुकीत 30 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

रनपच्या सार्वत्रिक निवडणुकीत 30 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

रत्नागिरी:- नुकत्याच झालेल्या नगर पालिका निवडणूकीत महायुतीने महाविकास आघाडीला धूळ चारत घवघवीत यश मिळवले. परंतु या निवडणुकीत त्या प्रभागात झालेल्या एकुण मतांच्या एक अष्टमांशपेक्षा मतदान झालेल्या ३० जणांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यातून पालिकेच्या तिजोरीत ४५ हजाराची भर पडली आहे. अनामत जप्त झालेल्यामध्ये चार नगराध्यक्षपदाचे उमेदवार असून उर्वरित नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा समावेश आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार संबंधित प्रभागात झालेल्या एकुण मतांच्या किमान अष्टमांश (१/८) मते मिळणे बंधनकारक आहे. जर उमेदवाराला तेवढी मते मिळाली नाहीत तर त्यांनी उमेदवारी अर्जाबरोबर भरलेली अनामत रक्कम सरकार जमा होते. याच नियमाला अनूसरून रत्नागिरी पालिकेच्या निवडणुकीत ३० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. दोन हजार ते एक हजार अशी अनामत रक्कम घेण्यात आली होती. यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या सहा उमेदवारांपैकी प्राजक्ता किणे, संध्या कोसुंबकर, वाहिदा मुर्तुझा, अॅड. सुस्मिता शिंदे यांची ४ हजार अनामत जप्त झाली आहे.

नगरसेवकपदासाठी रिंगणात असलेल्या प्रभाग १ मध्ये रुक्साना प्रभुलकर, रमीज झारी, मिलिंद साळवी, प्रभाग २ सोनाली केसरकर, योगेश हळदवणेकर, प्रभाग ३ मध्य भास्कर आंबेकर, प्रभाग ४ सायमा काझी, नाफिसा मजगावकर, इम्रान नेवरेकर, राहिल मुकादम, प्रभाग ८ मध्ये स्नेहा ठीक, शाहीद वस्ता, प्रभाग ९ श्रृष्टी आडमकर, संध्या कोसुमकर, अॅड. तमन्ना झारी, प्रभाग ११ तुषार कांबळे, प्रभाग १२ सचिन तळेकर, प्रभाग १३ फरझाना मस्तान, प्रसाद भुते, फैयाज मस्तान, इरफान होडेकर, प्रभाग १४ प्रकाश कीर, प्रभाग १५ राकेश आंब्रे, प्रभाग १६ रेहाना वस्ता, नाजीर मुल्ला, खलील वस्ता यांच्या समावेश आहे. यांची ४१ हजार एवढी अनामत रक्कम जप्त झाली आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांची एकुण ४५ हजार अनामत रक्कम शासन दरबारी जमा झाली आहे. यामध्ये कमीत कमी १३ मतांपासून ते जास्तीत जास्त २८१ पर्यंत नगरसेवकांना मतान झाले आहे. तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये ३१५ पासून ते ३ हजार १९ मतांचा समावेश आहे. या उमेदवारांना एकुण मतांचा एक अष्टमांश पेक्षा जास्त मते न मिळाल्याने त्याची अनामत जप्त झाली आहे. पालिका प्रशासनाने ही माहिती दिली.