रत्नागिरी:- स्वस्तिक हॉस्पिटल व चिरायु हॉस्पिटलच्या संस्थापिका रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या महिला स्त्रीरोग तज्ञ डॉ. सौ. सुनिता रमेश चव्हाण यांना आज पहाटे दीर्घ आजाराने देवाज्ञा झाली. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांचे राहते घरी स्वस्तिक बंगला, माळनाका येथे दुपारी २ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे.
त्यांची अंत्ययात्रा स्वस्तिक बंगला माळनाका ते चर्मालय स्मशानभूमी अशी सायंकाळी ४ वाजता राहत्या घरातून निघणार आहे असे डॉ.नितीन रमेश चव्हाण, चिरंजीव डॉ. नितिन चव्हाण ,कन्या डॉ. सौ. पल्लवी यादव , व डॉ.सौ वैभवी इंदुलकर ( पूर्वाश्रमीच्या डॉ. विशाखा चव्हाण) परिवार रत्नागिरी यांनी कळवले आहे.









