रत्नागिरी:- पतीसोबत भांडण झाल्याच्या रागातून पत्नीने राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. तिला उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवार 19 मार्च रोजी सकाळी 8.30 वा.सुमारास नाचणे येथे घडली.
अंबिका हनुमंत रायचूर (28,मुळ रा.कर्नाटक सध्या रा.रसाळवाडी नाचणे,रत्नागिरी) असे विषारी औषण प्राशन केलेल्या पत्नीचे नाव आहे. गुरुवारी सकाळी तिचे पती हनुमंत सोबत काही कारणावरुन भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरुन तिने राहत्या घरी उवा मारण्याचे औषध प्राशन केले. काही वेळाने तिला अस्वस्थ वाटू लागल्यावर तिच्या पतीने तिला उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. याबाबत तेथील पोलिस चौकित नोंद करण्यात आली आहे.









