१६ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान नाट्यगृहात आयोजन
रत्नागिरी:- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित केल्या जाणाऱ्या बहुचर्चित ‘६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२६-२७’ च्या प्राथमिक फेरीचे केंद्र यंदा रत्नागिरी ठरले आहे. शहरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात १६ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२६ या कालावधीत ही नाट्यस्पर्धा रंगणार असून, त्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
दररोज सायंकाळी ७ वाजता ही नाटके सादर होणार असून नाट्यप्रेमींसाठी तिकीट दर अवघे १५ रुपये आणि १० रुपये ठेवण्यात आले आहेत. सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी मेला तो शेवटचा होता, गुरुवार, १९ नोव्हेंबर लाईफलाईन, शुक्रवार, २० नोव्हेंबर पितामह उवाच, शनिवार, २१ नोव्हेंबर प्रिय आईस, रविवार, २२ नोव्हेंबर ब्लेम ट्रॅप अँड गेम, सोमवार, २३ नोव्हेंबर अॅन एनीमी ऑफ द पिपल, बुधवार, २५ नोव्हेंबर वॉरंट, गुरुवार, २६ नोव्हेंबर चांदणी, शुक्रवार, २७ नोव्हेंबर स्मृतिगंध, शनिवार, २८ नोव्हेंबर स्वप्रपंख, रविवार, २९ नोव्हेंबर Exception 375, सोमवार, ३० नोव्हेंबर षडयंत्र,
मंगळवार, १ डिसेंबर अंधारदिग्दर्शक, बुधवार, २ डिसेंबर सूर राहू दे, शुक्रवार, ४ डिसेंबर दैवायत्तम कुले जन्म, शनिवार, ५ डिसेंबर दि अॅनॉनिमस, रविवार, ६ डिसेंबर शेवंता जिती हाय, सोमवार, ७ डिसेंबर करायला गेलो एक आणि.. , मंगळवार, ८ डिसेंबर फक्त एकदा वळून बघ वाटा, बुधवार, ९ डिसेंबर तिचे संदर्भ नसलेली गोष्ट ही नाटक सादर होणंार आहेत.
रत्नागिरीतील स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना दाद देण्यासाठी आणि दर्जेदार नाटकांचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी, रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.









