रत्नागिरी, सिंधुदुर्गतील सहा स्मारके राष्ट्रीय संरक्षित

रत्नागिरीः– ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागामार्फत रत्नागिरीतील चार तर सिंधुदुर्गातील २ अशी सहा स्मारके राष्ट्रीय संरक्षित स्मारके म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये रत्नागिरीतील सुवर्णदुर्ग, जयगड किल्ला, पन्हाळे काजी लेणी, दाभोळ मशिदचा समावेश आहे. तर सिंधुदुर्गमधील विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या किल्ल्यांचा समावेश आहे.

यातील जयगड किल्ल्याची डागडुजी करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे.तर सिंधुदुर्गमधील विजयदुर्ग, सिंधुदुर्ग किल्ल्यांची डागडुजी सुरू आहे.

हर्णे बंदर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनार्यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड. भारत सरकारने या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. इ.स.१६६० मध्ये महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला आणि किल्ल्याची डागडुजी केली.दर्याराजे कान्होजी आंग्रे यांनी सुवर्णदुर्गाच्या बळावर सागरावर आपले वर्चस्व गाजविले.सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग हर्णेच्या बंदराजवळ वसलेला आहे. किल्ल्याच्या महाद्वाराजवळ पायरीवर कासवाचं शिल्प आहे, तर उजव्या बाजूला तटबंदीवर हनुमानाची मुर्ती कोरलेली आहे.प्रवेशद्वाराच्या आत पहारेकराच्या दोन देवड्या आहेत.सुवर्णदुर्गाच्या आत विहिरी तसेच पडझड झालेले वाड्याचे अवशेष आहेत. गडावरची तटबंदी आजही मजबूत अवस्थेत उभी आहे.गडावर एकून सात विहिरी आहेत.

किलल्याचे ऐतिहासिक महत्व सांगणारे१६व्या शतकातील संदभ उपलब्ध आहेत.विजापूरकरांनी बांधला असला तरी फार काळ त्यांना किल्ला ताब्यात ठेवता आला नाही.१५७८‚८०च्या दरम्यान संगमेश्वराच्या नाईकांनी किल्ल्याचा ताबा घेतला.आदिलशाहाने अनेकदा किल्ला मिUविण्याचे प्रयत्न करूनही त्यास यश आले नाही.१६९५च्या दरम्यान हा किल्ला कान्होजीआंग्रे यांच्याकडे होता.१८१८च्या इंगÏज मराठा युध्दाच्या वेळी हा किल्ला सहजपणे  इंग्रजांना मिळाला.
 

सह्याद्री पर्वतरांगेच्या पायथ्याशी कोटजाई व धाकटी नदीच्या खोर्यात पन्हाळेकाजी हे स्थळ असून साधारणत: इ. स. तिसर्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत समुद्र अशा इतिहासाची साक्ष असणार्या एकूण २९ लेणी येथे खोदण्यात आल्या आहेत. यांपैकी २८ लेणी कोटजाईच्या उजव्या किनार्यावर उत्तराभिमुख असून २९ वे लेणे बागवाडीजवळ गौर लेणे या नावाने प्रसिद्ध आहे. हीनयान (थेरवाद), वजÏयान, शैव, गाणपत्य व नाथ संप्रदायाचा ठसा या लेण्यांवर पडलेला दिसून येतो. या सर्व स्मारकांची देखरेख भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागामार्फत करण्यात येत आहे.