Wednesday, May 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रत्नागिरी शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुच्या बाजूला सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोघा तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताबीश मुबारक सरदार (वय ३५, रा. राजिवडा, रत्नागिरी) व शराफत शमसुद्दीन फणसोपकर (वय ३६, रा. राजिवडा, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. हि घटना गुरुवारी (ता.६) रात्री साडेआठच्या सुमारास प्रमोद महाजन क्रीडा संकुलच्या बाजूला एका शॉपीच्या समोर निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना आढळले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल पंकज पडेलकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोन संशयित तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.