Friday, September 25, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रत्नागिरी शहरात गांजा विक्रीप्रकरणी दोघांना अटक

रत्नागिरी शहरात गांजा विक्रीप्रकरणी दोघांना अटक

४४ ग्रॅम गांजासह दुचाकीसह दोन मोबाईल हस्तगत

रत्नागिरी:- शहरातील पेठकिल्ला ते रहाटाघर मार्गावरील ८० फूट हायवेवर- एमएसईबी कार्यालयासमोर गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगणाऱ्या पोलिसांनी दोघांना अटक केली. या कारवाईत गांजासह दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण १ लाख १ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

तैमूर अब्दुल लतीफ पावसकर (वय ३४, रा. ८० फूट हायवे, एमएसईबी कार्यालयामागे, रत्नागिरी) आणि अश्विन अमित जोईल (वय १९, रा. मांडवी, भैरी मंदिराजवळ, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. ही कारवाई बुधवारी (ता. २३) पहाटे ८० फुटी हायवेवर करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे साडेतीन च्या सुमारास शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी गस्तीवर होते. यावेळी पेठकिल्ला ते रहाटाघर ८० फूट हायवेवरील-एमएसईबी कार्यालयासमोरील रस्त्यावर संशयितांकडे गांजा आढळून आला. हा गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी दोघांविरुद्ध कारवाई केली.

जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये १,१०० रुपये किमतीचा ४४ ग्रॅम गांजा, गांजा ठेवण्यासाठी वापरलेल्या रिकाम्या प्लास्टिकच्या पिशव्या, संशयित तैमूर पावसकर याच्याकडील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि संशयित अश्विन जोईल याच्याकडील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल यांचा समावेश आहे. याशिवाय ८० हजार रुपये किमतीची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. या दुचाकीचा नोंदणी (क्र. एमएच ०८ बीएच ७३९६) असा आहे.

या प्रकरणी दहशतवाद विरोधी शाखेचे पोलिस हेड कॉन्स्टेबल योगेश तेंडुलकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८(क), २०(ब), २७(अ) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलीस अमंलदार करत आहेत.