रत्नागिरी:- शहरातील मांडवी, भाटये, साळवी स्टॉप, मारुती मंदिर या परिसरातील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या सहा तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजित दिलीप सरदेसाई (२५, रा. हिंदूकॉलनी माळनाका, रत्नागिरी), तजमुल अब्दुल हमिद हुनेरकर (३८, राजिवडा, रत्नागिरी), फैय्याज शब्बीर हुनेरकर (४२, राजिवडा, रत्नागिरी), आदित्य रवींद्र शेट्टी ९२२, ग्रीनपार्क अपार्टमेंट, साळवी स्टॉप, रत्नागिरी), अभिजित दिनेश सावंत (३२, रा. आशिर्वाद बंगला, शांतीनगर, नाचणे-रत्नागिरी), केतन अशोक खाडे (२५, रा. खाडेवाडी, टेंभे, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना शनिवारी (ता. ११) रात्री नऊ ते दहाच्या सुमारास शहरातील विविध परिसरातील सार्वजनिक ठिकाणी निदर्शनास आल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित तरुण सार्वजनिक ठिकाणी मद्य पाशन करत असताना पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी पोलस कॉन्स्टेबल प्रतीक कांबळे, सहायक पोलिस फौजदार राजेश भुजबळराव, पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे, पोलिस हेड कॉन्स्टेबल पंक पडेलकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









