लाखाचा ऐवज लंपास
रत्नागिरी:- मडगाव ते रत्नागिरी दरम्यान रेल्वे प्रवासात एका महिलेची सुमारे ७८,२७६ रुपये किमतीची लॅपटॉप बॅग आणि त्यातील किमती वस्तू चोरून नेल्याची घटना २४ मे रोजी घडली. त्रिवेंद्रम नॉर्थ-योगनगरी ऋषिकेश एक्सप्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास ही चोरी झाली असून, रत्नागिरी रेल्वे पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला २४ मे रोजी मडगाव रेल्वे स्थानकावरून रत्नागिरीकडे प्रवास करत होती. पहाटे सुमारे दीड ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास, फिर्यादी झोपेत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांची लॅपटॉप बॅग सीटवरून उचलून चोरून नेली. या घटनेने रेल्वे प्रवासातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
चोरलेल्या मालामध्ये एकूण ७८,२७६ रुपयांच्या वस्तूंचा समावेश आहे. त्यात प्रामुख्याने १ लाखाची काळ्या रंगाची लॅपटॉप बॅग, ७५,२७६ रुपयांचा लेनोवो कंपनीचा लॅपटॉप, लॅपटॉप चार्जर, मोबाईल चार्जर, ३,००० रुपये किमतीचे वन प्लस कंपनीचे इअरबड्स, आधारकार्ड आणि बँक कार्ड यांचा समावेश आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहिता कायद्याच्या कलम ३०५(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, रत्नागिरी रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रवाशांनी आपल्या सामानाची काळजी घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.