१३ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी:- शहरातील बाजारपेठ येथील एका इमारतीच्या शेडमध्ये मटका- जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १३ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात दोघा संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जयेश प्रकाश शिवलकर (वय ४४, रा. विनम्रनगर, नाचणे, रत्नागिरी) व प्रविण सुरेश बाष्टे (वय ३६, रा. रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी (ता. १८) दुपारी चारच्या सुमारास रामनाका साहित्य मंदिर मागील मलुष्टे यांच्या इमारतीच्या शेडच्या शेजारील मोकळ्या जागेत निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका इमारतीच्या शेडच्या मोकळ्या जागेत विनापरवाना मटका-जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली. या कारवाईत मटका जुगाराच्या साहित्यासह १३ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल वैभव नार्वेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.