Tuesday, October 20, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी तेलीआळी येथे भरधाव मोटर सायकल घसरून अपघात

रत्नागिरी तेलीआळी येथे भरधाव मोटर सायकल घसरून अपघात

दोघे जखमी; रत्नागिरी शहर पोलिसांत गुन्हा

रत्नागिरी:- शहरात भरधाव मोटर सायकल घसरून झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात ८ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गिरोबा चौक येथील दत्त मंदिरासमोर, तेलीआळी येथे घडला. आरोपी आयुष निलेश पारकर (वय २४, रा. खडपेवठार, रत्नागिरी, मूळ रा. नेवरे मुरुगवाडी) हा आपल्या ताब्यातील पल्सर मोटर सायकलवर (क्र. एमएच ०३/एवाय/१४९३) मागे कु. रुणाली राजेश शिवलकर हिला बसवून चालवत होता.
कोणताही परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) आणि विम्याचे कागदपत्र नसताना, तसेच रस्त्याची परिस्थिती न पाहता मोटर सायकल हलगटपणे आणि बेदरकारपणे चालवल्यामुळे चालकाचा वाहनावरील ता सुटला. त्यामुळे मोटर सायकल घसरून (स्लीप होऊन) झालेल्या अपघातात चालक आयुष पारकर आणि मागे बसलेली रुणाली शिवलकर हे दोघेजण लहान-मोठ्या दुखापतींनी जखमी झाले.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र मोहन पारकर यांनी फिर्याद दिली असून, त्यावरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या संबंधित कलमांन्वये आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.