रत्नागिरी तालुक्यात चार दिवसात दोनशे रुग्ण

रत्नागिरी:-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तालुक्यात देखील कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. चार दिवसात तालुक्यात 200 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. दिवसाला रत्नागिरी तालुक्यात सरासरी 50 रुग्ण सापडत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. 

राज्यात सर्वत्र कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी नव्याने लॉकडॉऊनची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यात देखील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. शुक्रवारी 24 तासात तब्बल 251 रुग्ण सापडले.

तालुक्यात मागील चार दिवसात 200 रुग्ण सापडले आहेत. मंगळवारी 32, बुधवारी 39, गुरुवारी 55 आणि शुक्रवारी 74 रुग्ण सापडले आहेत.