Sunday, May 3, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी-करबुडे मार्गावर कारला अपघात

रत्नागिरी-करबुडे मार्गावर कारला अपघात

कार थेट घुसली गडग्यात; मोठे नुकसान

रत्नागिरी:- रत्नागिरी-करबुडे मार्गावर गुरुवारी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास एका कारचा अपघात झाला. करबुडेहून रत्नागिरीकडे येताना एका उतारावर चालकाच्या डोळ्यावर थेट सूर्यप्रकाश पडल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार डाव्या बाजूला गडग्यात घुसली.

या अपघातात कारचे दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, सुदैवाने वाहनातील कोणालाही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले आणि कार बाहेर काढण्यासाठी सहकार्य केले.