रत्नागिरी:- शहरानजीकच्या एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग करत असताना नाचणकर चाळ समोर शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने 9 हजारांच्या गांजासह एकाला ताब्यात घेतले. या कारवाईत दुचाकीसह एकूण 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवार 25 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वा.सुमारास करण्यात आली.
सुरज परशुराम नंदीवले (23,मुळ रा.पाचवड वाई,जि.सातारा सध्या रा.नाचणकर चाळ एमआयडीसी,रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल शांताराम झोरे यांनी तक्रार दिल आहे. त्यानुसार, मंगळवारी दुपारी गुन्हे प्रकटीकरण पथक एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना संशयित हा आपल्या ताब्यात 9 हजार रुपये किंमतीचा 178.5 ग्रॅम गांजा हा अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून टिव्हीएस कंपनीची 55 हजारांची दुचाकी (एमएच-08-ए झेड-1575) असा एकूण 64 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयिताविरोधात एन.डी.पी.एस 8 (क),20(ब)(2),(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Make heading









