मुंबई-गोवा महामार्गावर दोन दुचाकींचा अपघात

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ वाशिष्टी डेअरी येथे गुरुवारी दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या अपघातात राजेंद्र जगन्नाथ वाघमारे (वय ४०, रा. खेड) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे उपचार सुरू आहेत.

गुरुवार, दिनांक २९ जानेवारी रोजी दुपारी दुचाकी क्रमांक (MH 08 N 6246) ला मुंबईकडून चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत राजेंद्र वाघमारे हे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले.

रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी जखमी राजेंद्र वाघमारे यांना तत्काळ ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. संस्थानच्या या रुग्णवाहिकेने दाखवलेल्या तत्परतेमुळे जखमीला वेळेत वैद्यकीय मदत मिळणे शक्य झाले.