रत्नागिरी:- शहरालगतच्या मिरजोळे कालिकानगर येथील महिलेला तरूणाने अश्लिल व जातीवाचक शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आह़े. ही घटना 12 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडल़ी. याप्रकरणी पिडीत महिलेने शहर पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी संशयित तरूणाविरूद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल़ा.
शैलेंद्र भाटकर (ऱा कालिकानगर मिरजोळे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला ही मिरजोळे कलिकानगर येथे वास्तव्य करत़े. 12 जुलै 2023 रोजी सायंकाळी एक महिला व मुलगा त्यांच्याकडे कांबळे कुठे राहतात अशी विचारणा करण्यासाठी आली होत़ी. त्यानुसार पिडीत महिलेने त्यांना कांबळे यांचे घर पुढे असल्याचे सांगितल़े. त्यानुसार ती महिला व मुलगा कांबळे यांच्या घराकडे निघून गेल़े.
या प्रकाराने संशयित आरोपी शैलेंद्र याची आई सुहासिनी भाटकर हिने पिडीत महिलेला शिवीगाळ करण्यास सुरूवात केल़ी. तसेच सांयकाळी 7 वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी शैलेंद्र देखील घरी आल़ा. शैलेंद्र आपली रिक्षा रस्त्याकडेला उभी करून तो लोखंडी रॉड घेवून पिडीत महिलेच्या घराच्या गेटमधून आत आल़ा यावेळी त्याने पिडीत महिलेला अश्लिल व जातीवाचक शिवीगाळ केल़ी. तसेच ठार मारण्याची धमकी दिल़ी अशी तक्रार पिडीत महिलेने शहर पोलिसांत दाखल केल़ी.
याप्रकरणी शहर पोलिसांनी शैलेंद्र भाटकर याच्याविरूद्ध भादंवि कलम 352,504,506 व अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 चे कलम 3(1) (आर)(एस) व 3 (2)(5अ) नुसार गुन्हा दाखल केल़ा. याप्रकरणी पुढील तपास रत्नागिरी उपविभागिय पोलीस अधिकारी विनीत चौधरी करत आहेत़.