रत्नागिरी:- तालुक्यातील मिरजोळे येथील प्रौढ आरे-वारे येथील समुद्र किनारी मृतावस्थेत आढळला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले होते. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनोजकुमार बाळकृष्ण पाटील (५९, रा. मिरजोळे, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ८) सकाळी सव्वासातच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत मनोजकुमार पाटील हे आरे-वारे येथील आपल्या बहिणीकडे रहात होते. शुक्रवारी सकाळी ग्रामस्थ शिवलकर हे समुद्र किनारी गेले असता त्यांना मृतदेह आढळला. या बाबत त्यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. तत्काळ ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.