रत्नागिरी:- अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो मित्राच्या मोबाईलवरून काढून घेवून ते फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात एकावर गुन्हा दाखल झाला असून फोटो व्हायरल करणारा संशयिताला पोलिसांनी मोकाट सोडले आहे.
शहरा नजीकच्या जवळच्या ग्रामपंचायत परिसरात हा प्रकार घडला आहे. एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो घेतले होते. याची माहिती त्याच्या मित्राला मिळाली होती. अश्लील फोटो पाहण्यासठी त्या अल्पवयीन मित्राच्या मुलाने त्याच्याकडे तगादा लावला होता. मात्र फोटो दाखवण्यास त्या मुलाने नकार दिल्याने मित्राने त्या अल्पवयीन मुलाच्या मोबाईलमधून फसवणूक करून ते फोटो काढून घेतले.
अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो काढून घेतल्यानंतर त्या मुलाच्या मित्राने ते फोटो सोशलमिडीयावर व्हायरल केले होते. अख्या गावात हे फोटो व्हायरल झाल्याने अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांना हि बाब समजली. त्यांनी पोलीस स्थानकात धाव घेऊन त्याबाबतची तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा केला. मात्र ज्याने फोटो सोशलमिडीयावर व्हायरल केले त्या तरुणाला पोलिसांनी मोकाट सोडले आहे.









