रत्नागिरी:- शहरातील माळनाका येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या अॅम्बेसेडर प्लाझा आणि ब्रुक्स या अपार्टमेंट शेजारील मोकळ्या जागेतील कचऱ्याला सोमवारी (ता. ३१) दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक आग लागली.
धुरांचे लोळ दिसू लागले धूर आजुबाजूच्या इमारतीकडे पसरू लागाला. त्यामुळे आजूबाजूच्या इमारतींना धोका निर्माण झाला. मात्र पालिकेच्या दोन अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले. या भागातील कचराने पेटला घेतला आणि आग आजूबाजूच्या पसरण्याची भिती निर्माण झाली होती. मात्र वेळीच पालकेचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अथक परिश्रमानंतर या आगीवर नियंक्षण मिळविण्यात यश आले. आगीचे ठिकाण अत्यंत अवघड होते. अग्निशामकाचे वाहन जाऊ शकत नाहीत अशी जागा होती. त्यामुळे छोटा अग्निशमनाने कर्मचाऱ्यांना नियंत्रणात आणताना कसरत करावी लागली. मात्र काही वेळानंतर दोन्ही अग्निशामकांचा वापर करुन आग विझविण्यात यश आले. रत्नागिरी शहर आणि परिसरात आग लागणे, वणवा पसरणे या सारख्या घटना वाढल्या आहेत. नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.









