रत्नागिरी:- तालुक्यातील खारभूमी-मालगुंड येथे विनापरवाना मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. संशयिताविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समिर यशवंत कदम (वय ५२, रा. गणपतीपुळे, मानेवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २९) दुपारी चारच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खारभूमी येथे मटका जुगार चालत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाल होती. त्या आधारे पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी संशयित जुगाराच्या साहित्यासह मटका जुगार चालवत असताना सापडला. या प्रकरणी पोलिसांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.