रत्नागिरी:- तालूक्यातील मालगुंड येथे अज्ञात कारणातून बेळगाव येथील प्रौढाने गळफास घेऊन आत्महत्या केली. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रकाश मारुती कुंभार (वय ४४, रा. नाईग्लज, ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक) असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २०) सकाळी साडेअकार्चाय सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र, मालगुंड येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत प्रकाश कुंभार हे खबर देणाऱ यांच्याकडे चालक म्हणून नोकरीला होता. प्रकाश याने कोणत्यातरी अज्ञात कारणातून गेस्टरुम मधील सिलींग फॅनला बेडशिटच्या सहाय्याने गळफास घेतला. त्याला उपचारासाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासुन मृत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.