रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. शहरातील मारुती मंदिर येथील सुमित्रा ज्वेलर्स दुकान फोडून चोरट्यांनी चांदी लंपास केली. सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी सुमित्रा ज्वेलर्स दुकान फोडले. दुकानाचे शटर उचकटत चोरट्यांनी आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांच्या हाती दुकानातील चांदी लागली. सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर ही बाब निदर्शनास आली. या प्रकरणी शहर पोलिस स्थानकात खबर देण्यात आली असून शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.









