मारुती मंदिर येथे मद्य प्राशन करणाऱ्या चार तरुणांविरुद्ध  गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या चार तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार दिलीप गावडे (२६, रा. चाफे, गावडेवाडी, रत्नागिरी), पंकज विठ्ठल गावडे (२८, रा. चाफे, गावडेवाडी, रत्नागिरी), अक्षय शिरिष पाटील (३०, रा. हिंदू कॉलनी, रत्नागिरी) व धनंजय जयदेव शिंदे (३२, रा. विनम्र नगर, नाचणे, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना शनिवारी (ता. २२) व रविवारी (ता. २३) रात्री साडेआठच्या सुमारास मारुती मंदिर येथील सार्वजनिक ठिकाणी निदर्शनास आल्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत असताना पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल राकेश तटकरी, केतन नंदकुमार साळवी, पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे, कौस्तुभ जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चारही तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.