मारुती मंदिर येथील वाईन मार्ट फोडून ६९ हजारांची चोरी

रत्नागिरी:- शहरातील वाईन मार्ट फोडून अज्ञात चोरट्याने दुकानातील ६९ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मारुती मंदिर परिसरात असलेले प्रियांका वाईन मार्ट मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्याने फोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील गल्ल्यात ठेवलेले ६९ हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले.लाखो रुपयांची दारू दुकानात असताना केवळ गल्ल्यातील पैसे चोरून नेल्याने हा चोरटा निर्व्यसनी असावा असा संशय व्यक्त होत आहे.

याप्रकरणी दुकानमालक तावडे यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.