महाडनाका येथे बंद फ्लॅट फोडून २४ हजाराचा ऐवज लंपास

खेड:- शहरातील महाडनाका येथील साई अपार्टमेंट मधील अज्ञात चोरट्यानी बंद फ्लॅट फोडून २४ हजाराचा ऐवज चोरून नेण्यात आला या चोरी मुळे येथील पोलिसांची झोपच उडवली आहे. ही घटना ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वा च्या सुमारास उघड झाली. 

खेड महाडनाका साई अपार्टमेंट येथील फिर्यादी -जगदीश महादेव जाधव (वय ५६ वर्ष), रुम नं डी-०२ यांच्या मालकीचा रुम नं-डी- ०२ या बंद फ्लॅटचा बाहेरील दरवाजा कडी कोयडा व लॉक कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी हत्याराने तोडुन त्याद्वारे फ्लॅटचे आतमध्ये प्रवेश केला बेडरुम मधील लाकडी कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले १० हजाराची रोकड व १४ हजार रुपये किमतीचे सोन्या, चांदीचे दागिने चोरुन नेले.