मलपी नौकांच्या वारेमाप मासेमारीमुळे किनार्‍यावरुन पापलेट गायब

रत्नागिरी:- परप्रांतीय वेगवान मलपी नौकांच्या बेछूट मासेमारीमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रातील पापलेट मासा गायब झाला आहे. समुद्राच्या तळापासून पृष्ठभागापर्यंतचा प्रत्येक लहान‚मोठा मासा या मलपी नौका जाळ्यात पकडून नेत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून स्थानिक मच्छिमार नौकाना पापलेट मासा मिळेनासा झाला आहे. त्यामुळे जो काही किरकोळ प्रमाणात आणि छोटा मासा मिळत आहे त्याचा दरही वधारलेला आहे. पापलेटची पिल्ले १ हजार रुपये किलोने विकली जात आहेत. त्यामुळे हा कोवळा मासा विकला जाणार नाही, या भितीने मासळी विक्रेता महिला हा मासाच मच्छी मार्केटमध्ये विक्रीसाठी घेवूनच येत नाहीत.

रत्नागिरी जिल्ह्याला १६७ कि.मी.चा समुद्र किनारा लाभला आहे. येथील मासा चविष्ट असल्याने त्याला चांगला दर मिळतो. त्यामुळे तामिळनाडू, कर्नाटक या ठिकाणच्या मलपी नौका या सागरी क्षेत्रात घुसून समूहाने मासेमारी करतात. एकाच ठिकाणी ४० ते ५० नौका मासेमारी करून समुद्राच्या तळापासून पृष्ठ भागापर्यंतचा मासा पकडून नेतात. अगधी महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात म्हणजे १२ नॉटीकल मैल अंतराच्या आत येवून या नौका मासेमारी करतात. त्यामुUे स्थानिक नौकांना मासळी मिळेनाशी झाली आहे. गेल्या वर्षभरापासून पापलेट मासा फारच तुरUक प्रमाणात मिUत आहे. सध्या बोंबील, घोU मासाही मिUत नाही. पूर्वी घोU मासा गरी टाकूनही मिUत होता.
परप्रांतीय मलपी नौका स्टीलच्या असतात. त्यामुUे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाची लाकडी गस्ती नौका कुचकामी ठरत आहे. या मलपी नौकांवर कारवाई करण्यास जाणार्या गस्ती नौकेवर तसेच स्थानिक नौकांवरही समूहाने मलपी नौकांकडून हल्ला होतो. मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेला तटरक्षक दलाची मदतही मिUत नसल्याने या मलपी नौकांवरील कारवाईला मर्यादा पडत आहेत.