मद्यधुंद अवस्थेतील तीन संशयितांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड परिसरातील सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत व मद्यपान करणाऱ्या तीन संशयितांविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत दुळाजी मांजरेकर (वय ६६, रा. वाटद वाघोकोडावाडी, रत्नागिरी), प्रकाश यशवंत पावरी (वय ५४, रा. गणेशवाडी जयगड, रत्नागिरी) संदेश सुर्यकांत बलेकर (वय ३२, रा. कांबळेलावगण, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना गुरुवारी (ता. १०) दुपारी दोन ते रात्री पावणे आठच्या सुमारास वाटद-मिरवणे फाटा, गणेशवाडी-जयगड व वाटद -खंडाळा बसस्थानक या ठिकाणी निदर्शनास आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित मांजेकर हे मद्यधुंद अवस्थेत असताना आढळले. प्रकाश पावरी मद्यपान करताना निदर्शनास आले. तर संदेश बेलकर हे मद्यधुंद अवस्थेत असताना सापडले. या प्रकरणी पोलिस हवालदार प्रसाद सोनावले, पोलिस शिपाई प्रितेश लोटणकर यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.