Tuesday, May 5, 2026
spot_img
Home रत्नागिरी सोमवारी रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

सोमवारी रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीसाठी नगर परिषदेचा निर्णय

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाने सोमवार, दिनांक १५ डिसेंबर रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

​या दिवशी सकाळपासून सायंकाळपर्यंत शहराच्या कोणत्याही भागात पाणीपुरवठा होणार नाही. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून नगर परिषदेने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी याची नोंद घ्यावी आणि उपलब्ध पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा.

​पाणीपुरवठा विभाग सोमवारचे काम पूर्ण करून मंगळवारपासून पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करेल. नागरिकांनी या काळात नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात येत आहे.