मंडणगड:- निगडी येथे एकास काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिशान अस्लम माटवणकर, निहाल अस्लम माटवणकर (निगडी मोहल्ला) यांच्या विरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात १५ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १४ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता घडला.
या घटनेची फिर्याद नझीर मुतलीक कोंडेकर (५३, निगडी मोहल्ला) यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात दिली. फिर्यादीतील माहितीनुसार १४ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास गावातील मारुती मंदिर नजीक हा प्रकार घडला. यातील’ फिर्यादी कोंडकर यांना जिशान माटवणकर याने घरी बोलावले. बुलेट गाडीने मारुती मंदिराजवळ नेले. तेथे निहाल अस्लम माटवणकर याने त्यांच्याशी भांडण करून शिवीगाळ केली. तसेच मारहाण करत जखमी केले.
या मारहाणीत कोंडेकर जखमी झाले. त्यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जिशान माटवणकर, निहाल माटवणकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.