भाऊ, चुलतीला मारहाण प्रकरणी पुतण्यावर गुन्हा दाखल 

खेड:- चुलत भावाने मोबाईलवर घाणेरडे मेसेज पाठवल्याची विचारणा करण्यासाठी गेलेल्या भावाने चुलती भांडणात पडल्याने चुलतीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद संशयिताची चुलती प्राची प्रकाश चव्हाण (५२, खेड) यांनी पोलीस स्थानकात दिली. सुहास सुरेश चव्हाण (शिवतर रोड ( खेड ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सुहास आणि प्राची हे दोघ नात्याने चुलती पुतण्या आहेत . ते एकाच घरात विभक्त राहत आहेत . प्राची यांच्या मुलाने आपल्या मोबाईलवरुन सुहास याच्या मोबाईलवर वाईट मेसेज पाठवला होता .. भावाचा मोबाईलवरील मेसेज पाहण्यासाठी सुहास हा त्यांच्या घरी गेला होता . यावेळी प्राची यांनी त्याला अडवले . तू त्याचा मोबाईल का बघतोस असे विचारले . यावरुन त्यांच्यात बाचाबाची झाली . यावेळी सुहास याने कपडे धुण्याच्या धोपटयाने प्रसाद चव्हाण याला मारहाण केली . प्रसाद याच्या डोक्यात धोपटा घातल्याने दखापत झाली . तसेच प्राची यांना ढकलून दिले . यामध्ये प्राची यांनाही मुका मार लागला . यापुढे माझ्या वाटेत गेलात तर तुम्हाला ठार मारुन टाकीन अशी धमकी प्राची यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुहार सुरेश चव्हाण याच्यावर भादविकलम ३२४ , ३२३ , ५०४ , ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.