Tuesday, June 2, 2026
spot_img
Home दापोली बोलेरो-स्कोडा कार अपघातात 4 जखमी, बोलेरो चालकावर गुन्हा

बोलेरो-स्कोडा कार अपघातात 4 जखमी, बोलेरो चालकावर गुन्हा

दापोली:- तालुक्यातील हर्णे बायपास रोडवर बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोन चारचाकींचा अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीने स्कोडा रॅपिड गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी हर्णे सागरी पोलिसांनी बोलेरो चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश अशोक चव्हाण (१९, रा. मुरुड, ता. दापोली) हा आपल्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन (एम.एच.०६ बी.डब्ल ५१६०) भरधाव वेगाने चालवत होता. हर्णे बायपास रोडवर, अगस्त्य हॉटेलजवळ त्याने समोरून येणाऱ्या श्रुती लक्ष्मण कमठेकर (वय २८, रा. मीरा रोड ईस्ट, ठाणे) यांच्या ताब्यातील स्कोडा रॅपिड वाहन (क्र.एम.एच.०२ सी.पी. ७३५९) याला जोरदार धडक दिली.

या अपघातात स्कोडा रॅपिडमधील चार प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये श्रुती लक्ष्मण कमठेकर (वय २८, रा. मुंबई), नील शिरवाडकर (वय १७, रा. नवी मुंबई), अदिती जय नागवेकर (वय १५, रा. श्रीवर्धन, जि. रायगड) आणि जुही नागवेकर (वय २२, रा. श्रीवर्धन, जि. रायगड) यांचा समावेश आहे. अपघातानंतर तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची नोंद दिनांक ११/०६/२०२५ रोजी सायंकाळी ७.३७ वाजता हर्णे सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. बोलेरो चालक आकाश अशोक चव्हाण याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.