बेपत्ता तरुणाचा तळ्यात आढळला मृतदेह

गुहागर:- गुहागर शहरातील गुरववाडी येथील मूर्ती कलाकार व चित्रकार म्हणून नाव असलेला संतोष परशुराम गुरव ( 44 ) हा गुरुवारी बेपत्ता झाला होता शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता शहरातीलच श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या तळ्यामध्ये त्याचा मृतदेह मिळून आला सदर घटनेमध्ये ही आत्महत्या की अपघात याबाबतचा खुलासा अद्याप झालेला नाही.

मयत संतोष गुरव हा गुरुवारी सायंकाळी घरी न सांगता घराबाहेर पडला यामुळे त्याची शोधाशोध सुरू झाली ग्रुप वर फोटो टाकल्यानंतर अनेकांनी तो मोडका आगर येथे दिसला, चिखली येथे दिसला अशा सूचना टाकावयास सुरुवात केली दरम्यान शुक्रवारी सकाळी साडेआठ ते नऊ वाजता च्या दरम्यान श्री लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये पूजेसाठी गेलेल्या गुरुजींना मंदिराच्या आवारात अंगावरील कपडे तसेच सायकल मिळून आली सदर घटनेबाबत गुहागर पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान मिळून आलेले अंगावरील कपडे व सायकल ही संतोष गुरव यांचीच असल्याचे स्पष्ट झाले होते मात्र तळ्यामध्ये शोध घेतले असता तो कुठेही मिळून आला नाही अखेर एक वाजताच्या दरम्याने त्याचा मृतदेह तळ्याच्या पाण्यामध्ये तरंगू लागला त्यानंतरच तो मयत झाला असल्याचे समजले.

संतोष हा चांगला चित्रकार व मूर्तिकारही होता त्यामुळे त्यांनी गुरववाडी येथे गणेश मूर्ती कारखाना ही सुरू केला होता यावर्षी तो आपल्या ग्राहकांना कारखाना बंद केला असल्याचे संदेश पाठवत होता. त्याला थोडे विस्मरणाचा त्रास होता त्यामुळे त्याची अधिक काळजी घरची घेत होते परंतु शुक्रवारी तळ्यामध्ये मयत स्थितीत आढळून आल्याने तो आंघोळीसाठी गेला असताना अपघात होऊन पडला की त्याने आत्महत्या केली याबाबतचा अद्यापही स्पष्ट खुलासा झालेला नाही. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्यासह उपनिरीक्षक संदीप भोपळे तसेच असगोली येथील पोलीस पाटील उदय असगोलकर, आरे येथील पोलीस पाटील मिलिंद सुर्वे व ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.