Tuesday, May 5, 2026
spot_img
Home गुन्हेगारी बेकायदा शस्त्र प्रकरणातील आरोपीची जामिनावर सुटका

बेकायदा शस्त्र प्रकरणातील आरोपीची जामिनावर सुटका

गुहागर:- तालुक्यातील शृंगारतळी परिसरात गस्त घालत असताना पोलिसांनी बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकाला अटक केली होती. त्या आरोपीवर गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ व २५ अन्वये दाखल करण्यात आला होता. आरोपी संजय श्रीधर फुणगुस्कर रा वेलदूर नवानगर ता गुहागर याची गुहागर न्यायालयाने जामिनावर सुटका करण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने आरोपीस रुपये १५,०००/- च्या जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला.

या प्रकरणात पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून एक गावठी बंदूक व जिवंत काडतुसे जप्त केल्याचा दावा करत न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र आरोपीतर्फे अ‍ॅड. अलंकार विखारे यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करत पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचे मांडले. आरोपीकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आधीच पोलिसांच्या ताब्यात असल्याने पुढील तपासासाठी आरोपीची पोलीस कोठडी आवश्यक नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीस रुपये १५,०००/- च्या जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला. सदर प्रकरणात आरोपीतर्फे अ‍ॅड. अलंकार विखारे यांनी बाजू मांडली असून त्यांना त्यांचे वरिष्ठ अ‍ॅड. संकेत साळवी यांचे मार्गदर्शन लाभले.