बीएसएनएलची केबल चोरणाऱ्या तीन संशयित चोरट्यांना अटक

रत्नागिरी:- शहरातील जेलनाका ते डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील बीएसएनएल कार्यालयाची ३ लाख २१ हजार ३८१ रुपये किमतीची भूमिगत टेलिफोन केबल चोरुन बीएसएनएलची सेवा ठप्प करणाऱ्या तीन संशयित चोरट्यांना शहर पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दूल मदारसाब मुल्ला ( ४१, रा . खालचा फगरवठार , मुळ रा . काटा मार्केट – विजापूर , कर्नाटक ) , मन्नु उर्फ रामस्वरुप पटेल ( ४५ , रा . रत्नागिरी , मुळ रा . ग्रामभाटीया , ता . मैजीयाद जि . सतना , मध्यप्रदेश ) , युवराज बाळू गोसावी ( रा . विक्रमनगर , कागल , ता . जि . कोल्हापूर , सध्याः खडपेवठार झोपडपट्टी , रत्नागिरी ) अशी संशयितांची नावे आहेत . ही घटना १५ जून सकाळी १० वाजताच्या सुमारास निदर्शनास आली होती . संशयितांनी जेल नाका ते डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळा या परिसरातील ५१ हजार ९०० रुपये किमतीची १० मिटर लांबीची काळ्या रंगाची १२०० पेअर ची केबल , ५१ हजार ९ ०० रुपये किमतीची १० मिटर काळ्या रंगाची बाराशे पेअरची केबल , तर १ लाख २९ हजार ७५० रुपये किमतीची २५ मिटर लांबीची काळ्या रंगाची बाराशे पेअर ची केबल , ८६ हजार ९२५ रुपये किमतीची सुमारे ८० मीटर लांबीची काळ्या रंगाची ४०० पेअर ची केबल . तसेच ९०६ रुपये किमतीची ५ मिटर लांबीची काळ्या रंगाची ५० पेअर ची केबल असा सुमारे ३ लाख २१ हजार ३२१ रुपयांची भुमिगत टेलिफोन केबल चोरट्यांनी पळविल्या होत्या . या प्रकरणी नंदकुमार केरु कांबळे ( ५० , रा . सिद्धीविनायक नगर , रत्नागिरी ) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती . तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता . तपास पोलिस उपनिरीक्षक बी . डी . वनवे करत होते . तपासात संशयित मुल्ला यांच्याकडून चोरी केलेला काही मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला असून उर्वरित मुद्देमाल त्याने संशयित युवराज गोसावी याला विक्री केल्याचे सांगत आहे . मात्र गोसावीने हा मुद्देमाल कोल्हापूर येथे विक्री केला असून कोणास दिला या बद्दल माहिती देत नाही . पोलिसांनी तीन संशयितांना आज शनिवारी अटक केली आहे . तिनही संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे . न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.