Friday, September 11, 2026
spot_img
Home गुन्हेगारी बालिकेवर लैंगिक अत्याचार, तरूणाला पोलीस कोठडी

बालिकेवर लैंगिक अत्याचार, तरूणाला पोलीस कोठडी

संगमेश्वर:- ओळखीचा गैरफायदा घेत आणि घरी कोणी नसल्याची संधी साधत तरूणाने बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना
संगमेश्वर तालुक्यात निवे बुद्रुक येथे घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा तरूण व बालिका मूळची उत्तरप्रदेशमधील आहेत. तरूण व बालिकेचे कुटुंब कामानिमित्त निवेबुद्रुक येथे सध्या वास्तव्यास आहेत. दरम्यान, देवरूख पोलीसांनी या तरूणावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

याबाबत देवरूख पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आनंद विजयकुमार चव्हाण असे या नराधमाचे नाव आहे. तो मूळचा उत्तरप्रदेशमधील आहे. आनंद चव्हाण हा प्रथम कामानिमित्त रत्नागिरीत वास्तव्यास होता. परंतु दोन महिन्यांपुर्वी तो निवेबुद्रुक येथे वास्तव्यास आला होता. याठिकाणी त्याची उत्तरप्रदेशमधील बालिकेशी ओळख निर्माण झाली. त्याने ओळखीचा गैरफायदा घेत आणि घरी कोणी नसल्याची संधी साधून या बालिकेवर लैंगिक अत्याचार केले. बालिकेच्या पोटात दुखू लागल्याने घरातील मंडळींनी तिला जवळच्या रूग्णालयात नेले असता ती काही महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. घरच्या मंडळींनी तिला विचारणा केली असता तिने आनंद चव्हाण याने आपल्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. यानंतर देवरूख पोलीस ठाण्यात घरच्या मंडळींनी आनंद याच्याविरोधात रितसर तक्रार दिली. यानुसार पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे करीत आहेत.