बसची वाट पाहणाऱ्या दोन महिलांना कंटेनरची धडक

खेड:- एसटी बसची वाट पाहणाऱ्या दोन महिलांना कंटेनरने धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्याची घटना वेरळ- खोपीफाटानजीक घडली. या दोन्ही महिलांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वेरळ-खोपीफाटा येथे डंपरखाली दुचाकीस्वार चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना भोस्ते घाट उतरून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने एस टी च्या प्रतीक्षेत असलेल्या दोन महिलांना धडक दिली. या अपघातात दोन्ही महिला गंभीररित्या जखमी झाल्या. अपघाती माहिती मिळताच स्थानिक पोलीस व मदतकर्ते तातडीने घटनास्थळी पोहोचून दोन्ही महिलांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे.