बलात्काराच्या आरोपातून संशयित आरोपीची निर्दोष सुटका

रत्नागिरी:- तालुक्यातील दाभिळ आंबेरेतील 22 वर्षीय तरूणीवरील बलात्काराच्या खटल्यात पोलिसांच्या जप्ती पंचनाम्यात विसंगती आढळल्याने आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल़ी. सुभाष सीताराम चौगुले (31, ऱा खानवली चौगुलेवाडी, लांजा) असे मुक्तता करण्यात आलेल्याचे नाव आह़े. त्याच्याविरूद्ध पूर्णगड पोलिसांनी तपास करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र दाखल केले होत़े.

दाभिळ आंबेरे येथे 1 फेबुवारी 2021 रोजी सुभाष चौगुले याने पीडित तरूणीवर बलात्कार केल्याची खबर पोलिसांना मिळाली होत़ी. त्यानुसार पूर्णगड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाल़े. यावेळी पीडित तरूणीने आपल्याला तक्रार दाखल करायची असल्याचे पोलिसांना सांगितल़े. त्यानुसार 1 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास घटनेच्या प्रसंगाचे पीडितेचे कपडे पोलीस घेऊन गेले, असे पीडितेने न्यायालयापुढे सांगितल़े मात्र पोलिसांच्या जप्ती पंचनाम्यानुसार पीडितेचे कपडे 6 फेब्रुवारी 2021 रोजी जप्त करण्यात आले, अशी नोंद आह़े तर पंच साक्षीदारानुसार 2 फेबुवारी 2021 रोजी पंचनामा करण्यात आल़ा. एकूणच जप्ती पंचनाम्यातील विसंगतीमुळे नेमका जप्ती पंचनामा कधी झाला, हे स्पष्ट होत नसल्याने तो विश्वासार्ह नाही, असे न्यायालयाने नोंदवल़े.

बलात्काराची घटना घडल्यानंतर पीडितेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल करण्यात आले होत़े. यावेळी जिल्हा रूग्णालयातील ड़ॉ ज्ञानेश विटेकर यांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केल़ी. यावेळी पीडितेचे कपडे वैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखवण्यात आले नव्हत़े. प्रत्यक्षात शक्य तितक्या लवकर वैद्यकीय अधिकाऱ्यांना पीडितेचे कपडे दाखवणे अत्यावश्यक होत़े. या संबंधीचे कोणतेही कारण सरकार पक्षाकडून न्यायालयापुढे सांगण्यात आले नाह़ी. पीडितेची वैद्यकीय तपासणीही पश्न उपस्थित करत आह़े, असे न्यायालयाने निकालपत्रात नोंदवल़े. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल़ ड़ी बिले यांनी या खटल्याचा निकाल दिल़ा. आरोपीच्यावतीने ऍड़ प़ी पी सुर्वे यांनी काम पाहिल़े