गुहागर:-गुहागर तालुक्यातील जानवळे तेलीवाडी येथे दरवाजाचे कुलूप फोडून लोखंडी कपाटातील 1 लाख 60 हजार रुपयांचे दागिने चोरीस गेल्यास घटना समोर आली आहे. याबाबतची फिर्याद प्रभावती शंकर तुप्ते (68, जानवळे, तेलीवाडी, गुहागर) यांनी येथील पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुप्ते घरी नसताना अज्ञाताने यांच्या कपाटातील काळया बॅगेमध्ये ठेवलेली 20 हजार रुपये किंमतीची सोन्याची माळ, 78 हजार रुपये किंमतीच्या दोन बांगडया, 8 हजार 650 रुपयांच्या कानातील टॉप्स, 13 हजार 150 रुपयांची सोन्याची अंगठी, 10 हजार रुपयांची सोन्याची अंगठी, 12 हजार 600 रु. किंमतीची सोन्याची चेन, 4 हजार 260 रुपयांचे कानातील रिंग तसेच 8500 रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.









