Saturday, June 27, 2026
spot_img
Home चिपळूण अंगावर लाकूड पडून कामगाराचा मृत्यू

अंगावर लाकूड पडून कामगाराचा मृत्यू

चिपळूण:- कामाच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत एका ५८ वर्षीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. फुरुस येथे मजुरीचे काम करत असताना अचानक पोटावर लाकूड पडल्याने गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत दिनेश गणु बाईत (वय ५८, रा. संगलट शेरवली, ता. खेड) हे फुरुस येथे मजुरीच्या कामासाठी गेले होते. काम करत असताना त्यांच्या पोटावर अचानक लाकूड पडल्याने ते गंभीर जखमी झाले. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी दापोली येथील मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारांसाठी डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. येथील आय.सी.यु. विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे खेड आणि चिपळूण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद (अ.म.क्र. ५१/२०२६, बी.एन.एस.एस. कलम १९४) केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.