रत्नागिरी:-शहरातील टि.आर.पी येथे प्रॉपर्टी आपल्या नावे करुन देत नसल्याच्या रागातून पतीवर कात्रीने छातीवर आणि मनगटावर मारुन गंभीर दुखापत केल्याप्रकरणी पत्नीविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवार 16 सप्टेंबर रोजी सकाळी 8.15 वा.सुमारास घडली.
शितल जयदीप पाटील (32,रा.आदिनाथ सी स्क्वेअर टिआरपी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पत्नीचे नाव आहे. तिच्या विरोधात पती जयदीप प्रकाश पाटील (34,रा.आदिनाथ सी स्क्वेअर टिआरपी,रत्नागिरी) याने शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार,जयदीपच्या चारित्र्यावर संशय घेउन टि.आर.पी येथील प्रॉपर्टी आपल्या नावे करुन देण्याची मागणी शितलने केली होती. परंतू जयदीप असे करुन देण्यास तयार होत नसल्याने या रागातून मंगळवारी सकाळी शितलने त्याच्याशी भांडण करुन लोखंडी कात्री त्याच्या छातीत आणि उजव्या मनगटावर मारली. यात जयदीप गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर शितलने मुलांना आणि जयदीपच्या आई-वडिलांनाही शिवीगाळ केली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस नाईक जाधव करत आहेत.