रत्नागिरी:- एमआयडीसी येथे पोलिस असल्याची बतावणी करुन स्नॅक्स सेंटरच्या गल्ल्यातील 4 हजाराची रोख रक्कम चोरणाऱ्या दोन संशयितांना न्यायालयाने मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.
शाहिद सादीक मुजावर (वय 32, रा. धनजीनाका, बेलबाग, रत्नागिरी) व फुरकान यासिन फणसोपकर (वय 30, रा. कोकणनगर, रत्नागिरी) अशी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताची नावे आहेत. ही घटना बुधवार 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वा. सुमारास मिरजोळे एमआयडीसी येथील राहूल स्नॅक्स सेंटर येथे घडली होती.