रत्नागिरी:- शहरानजीकच्या पोमेंडी खुर्द येथील श्री महालक्ष्मी मंदिराची दान पेटी फोडून अज्ञातानी चोरी केली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप श्रीकृष्ण पटवर्धन यांनी शहर पोलिस ठाण्यात या चोरी बाबत तक्रार दिली आहे.
बुधवार 7 डिसेंबर रोजी रात्री 11.45 ते 12.45 वा. कालाधीत तीन अज्ञातांनी श्री महालक्ष्मी मंदिरातील दानपेटीचे कडी-कोयंडा उचकटून त्यातील रक्कम चोरुन नेली. हा सर्व प्रकार तेथील सीसीटिव्हीत कैद झाला असून तीन संशयित ही चोरी करतान दिसून येत आहेत. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.