पेढांबे पूल येथे तरुणाला मारहाण; तिघांवर गुन्हा

चिपळूण:- तालुक्यात पेढांबे पूल परिसरात एकाला मारहाण केल्याची घटना गुरुवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये नितीन सदाशिव कदम (३७, खडपोली) जखमी झाला असून तिघांवर अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बाप-मुलासह चुलत्याचा समावेश आहे.

राहुल संजय पवार, त्याचे वडील संजय पवार, तर राहुल याचे चुलते (नाव, गाव माहित नाही) (सर्व-पेढांबे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद नितीन सदाशिव कदम यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर रोजी ९.१५ वाजण्याच्या सुमारास नितीन कदम व त्यांचे मित्र असे हनुमान सायकल मार्ट पेढांबे ब्रीज येथे दुचाकीचे पंक्चर काढण्यासाठी आले होते. तेथेच काही वेळापूर्वी अभिजीत धोत्रे व त्याच्या वाडीत राहणारा राहुल पवार यांच्यात झालेला वाद नितीन याने मध्यस्थी करून मिटवला होता. त्याचा राग मनात धरून राहुल व त्याचे वडील संजय पवार तसेच चुलते हे तेथे आले व त्यांनी नितीन याला शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. असे असताना राहुलने त्याच्या हातात असलेल्या लोखंडी धातूच्या वस्तूने नितीनच्या नाकावर मारून दुखापत केली. याप्रकरणी त्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.