Wednesday, June 10, 2026
spot_img
Home रत्नागिरी पावस येथे शॉर्टसर्किटमुळे ओमनीने घेतला पेट

पावस येथे शॉर्टसर्किटमुळे ओमनीने घेतला पेट

रत्नागिरी:- तालुक्यातील मेर्वी येथील संजय बेंद्रे यांच्या मालकीची मारुती ओमनी गाडी मेकॅनिक दुरुस्तीसाठी घेऊन जात असताना पावस येथे गाडीत अचानकपणे शॉर्टसर्किट झाल्याने ती अचानक पेटली. या घटनेत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. रविवारी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

स्थानिक ग्रामस्थांसह रनपार येथे असलेल्या फिनोलेक्स कंपनीच्या अग्निशमन दलाने नंतर व्हॅनला लागलेली आग घटनास्थळी दाखल होऊन नियंत्रणात आणली. मात्र, तोपर्यंत या घटनेत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

मेर्वी येथील संजय बेंद्रे यांची ओमनी गाडी (क्रमांक MH08-R-1550) बिघडल्यामुळे दुरुस्तीसाठी कोळंबे येथील गॅरेजमध्ये नेण्यात येत होती. ती गाडी कोळंबे येथे नेत असताना पावस येते बंद पडली. गाडी दुरुस्ती करणाऱ्याने ती चालवण्याचा प्रयत्न केला. परंतु चालू झाली नाही. अखेर त्यासंदर्भात मुख्य मेकॅनिकला या संदर्भात माहिती दिली असताना गाडीत अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि गाडीने पेट घेतला. आजूबाजूच्या दुकानदारानी बोंबाबोंब केल्यानंतर ही बाब मेकॅनिकला सांगण्यात आली. त्यामुळे तो मेकॅनिक तातडीने गाडीच्या बाहेर पडला आणि गाडीची आग वाढली. या मार्गावरील वाहतूक काहीकाळ बंद करण्यात आली. ही गोष्ट वेळीच लक्षात आल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या दुकानदारांनी सावधगिरी बाळगल्यामुळे धोका पोहोचला नाही. जवळच्या हॉटेलमधून पाणी आणून आग आटोक्यात आणण्याच प्रयत्न झाल. परंतु तोपर्यंत ओमनी जळून खाक झाली होती.