Wednesday, October 21, 2026
spot_img
Home गुन्हेगारी पावस येथे तपासणी करताना डॉक्टरकडून तरुणीचा विनयभंग

पावस येथे तपासणी करताना डॉक्टरकडून तरुणीचा विनयभंग

रत्नागिरी:-  तालुक्यातील पावस येथील एका क्लिनिकमध्ये डॉक्टरकडे तपासणी करता गेलेल्या एका २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. याप्रकरणी पूर्णगड सागरी पाेलिस स्थानकात डॉ.समीर गिजबिले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार तिला ६ ऑक्टाेबरपासून सर्दी, ताप येत असल्याने ती डॉक्टरकडे तपासणीसाठी गेली हाेती. त्यांनी तपासून इंजेक्शन व औषधे दिल्याने तिला फरक पडला. त्यानंतर तिला मासिक पाळीचा त्रास सुरू झाल्याने ९ ऑक्टाेबर राेजी ती सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान आईला घेऊन डॉक्टरकडे गेली होती. त्यावेळी तपासणी करताना डॉक्टरने विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तिने हा प्रकार थोड्या वेळाने आपल्या आईला सांगितला. त्यानंतर या घटनेबाबत घरात चर्चा केल्यानंतर १६ ऑक्टाेबर राेजी रात्री पूर्णगड सागरी पाेलिस स्थानकात डॉक्टरवर भारतीय न्याय संविधान कलम ७५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ए. एम. कुबडे करत आहेत.