रत्नागिरी:- दारुच्या नशेत शिवीगाळ केल्याच्या रागातून दोन नेपाळी गुरख्यांचा निर्घूण खून करणार्या संशयिताची न्यायालयाने न्यायालयीन कोठडी रवानगी केली. सरणकुमार उर्फ गोपाळ क्षतीराम विश्वकर्मा (५८, मुळ रा. नेपाळ सध्या रा. गोळप, रत्नागिरी ) असे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
संशयिताने २९ एप्रिलला रात्री मद्याच्या नशेत झालेल्या हाणामारीत खडकबहाद्दूर बलराम थापा क्षेत्री ( ७२ ) व भक्तबहाद्दूर बलराम थापा क्षेत्री (६७, दोन्ही मुळ रा. कैलाली, नेपाळ सध्या रा. गोळप, रत्नागिरी ) या दोन सख्ख्या भावांचा शिवीगाळ केल्याच्या कारणातून खून केला होता. गुरुवारी त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.









