Tuesday, May 5, 2026
spot_img
Home रत्नागिरी निवेंडी-बौद्धवाडी येथील तरुणाची आत्महत्या

निवेंडी-बौद्धवाडी येथील तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील वरची निवेंडी-बौद्धवाडी येथील तरुणाने मद्याच्या नशेत आंबा काजूच्या बागेतील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. निखिल मंगेश कदम (वय १९ रा. निवेंडी-बौद्धवाडी, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १२) सकाळी उघडकीस आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार निखिल कदम याने दारुच्या नशेत म्हैसकोंड तळेपाटवाडी, वरची निवेंडी येथील स्वतःच्या मालकीच्या आंबा काजूच्या झाडाला गळफास घेतला. उपचारासाठी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथे दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.